Dhananjay Munde संबंध नसताना सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर ट्रायल, धनंजय मुंडे यांची खंत

विशेष प्रतिनिधी

बीड : ज्या घटनेशी आपला कोणताही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग 250 दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. Dhananjay Munde

मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता. यावर बोलताना ते म्हणाले “अत्यंत कठीण काळात मी दोनदा मरता मरता वाचलो होतो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे.



ते म्हणाले, माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे. त्या कठीण काळात मी कुठल्याही माध्यमांवर बोललो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी सगळ्या आजारांतून बाहेर पडलो आहे, फक्त आता डोळ्यांच्या आरोग्याचे थोडे बाकी आहे. पण माझा जन्म लोकांची सेवा करण्यासाठी झाला आहे, म्हणूनच मी आज तुमच्यासमोर आहे. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरे काही नाही. Dhananjay Munde

विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर भाष्य केले. या निवडणुकीत मायबाप जनतेने मला 1 लाख 42 हजार मतांच्या प्रचंड आघाडीने निवडून दिले. मतांच्या आघाडीत महाराष्ट्रात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. मात्र, एवढा मोठा विजय मिळूनही आपल्याला तो साजरा करता आला नाही, अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली. Dhananjay Munde

Trial on electronic media for 250 consecutive days without any connection, Dhananjay Munde regrets

महत्वाच्या बातम्या