विशेष प्रतिनिधी
पुणे: राज्याचा राजकारणात पुन्हा निवडणूक रणधुमाळी पाहायला मिळू शकते.राज्यातील विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी लवकरच निवडून प्रक्रिया पार पडू शकते.यामध्ये १३ मे रोजी कार्यकाळ संपणाऱ्या ९ सदस्यांचा जागांसह गेली अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या १७ जागांचा देखील समावेश आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्यामुळे विधानपरिषेदची अनेक जागांची निवडणूक झालेली नव्हती.मात्र निवडणूक प्रक्रियेमधील अडथळे दूर झाल्याने, संबंधित जागांचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे.
कोणत्या मतदारसंघात होणार निवडणूक?
राज्यातील सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली – सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा – गोंदिया, रायगड – सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अमरावती, धाराशिव – लातूर – बीड, परभणी – हिंगोली आणि छत्रपती संभाजी नगर – जालना त्या मतदारसंघांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.
कुणाचे पारडे जड?
विधानसभेतील विद्यमान संख्याबळाचा विचार केला तर महायुतीचे पारडे निवडणुकीत जड आहे. आकडेवारीनुसार रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळू शकतात, तर शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळू शकते, तर महावीर का सगळ्यांच्या वाट्याला एक जागा जाग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे विविध पक्षातून इच्छुकांचे मोठे गर्दी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Election campaign underway in the state again! Elections will be held for 28 seats of the Legislative Council.
महत्वाच्या बातम्या
- CM Fadnavis : शेजारील देशांत पेट्रोल ४५० रुपये; आपण वेळीच सावध व्हायला हवे, पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
- Rupali Chakankar : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांची ६ तास कसून चौकशी, पूजा-विधी, आर्थिक व्यवहार आणि राजकीय संबंधांवर प्रश्नांची सरबत्ती
-
‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध