विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना घरांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने 1768.08 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, या निर्णयाचा लाभ 5459 पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांना मान्यता देत घरबांधणी अग्रीम स्वरूपात ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलिसांना स्वतःचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आपण सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले.
2014 ते 2019 या काळात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबवण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना नव्याने सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या घरांच्या किमती आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर घरबांधणीसाठी मिळणारे अग्रीम अनुदान पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा संदेश या निर्णयातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आगामी काळात पोलिसांच्या निवासाच्या प्रश्नांवर आणखी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Fadnavis government announces ₹1,768 crore housing boost for 5,459 police personnel
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी