विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : नाशिकमधील जिहाद प्रकरण हे काही एका व्यक्तीचे काम नाही, यामागे मोठी टोळी आहे. हे आंतरराष्ट्रीय लेव्हलवर रॅकेट आहे. निदा खान ही देखील पेड वर्कर हाेती, असा दावा सामाजिक न्याय मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. Nida Khan
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शाेषण आणि धर्मांतर प्रकरणातील संशयित मुख्य आराेपी निदा खान छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात सापडली. या पार्श्वभूमीवर शिरसाट म्हणाले, धर्मांतराचे माेठे रॅकेट आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून फंड मिळतात. लव्ह जिहाद प्रकरणामध्ये सुद्धा असेल फंडिग केले जाते, हे सिद्ध झाले आहे. निदा खानला सुद्धा फंड दिला जात होता हे सिद्ध झाले आहे. निदाला उघडपणे पाठिंबा देणारे सुद्धा यामध्ये कुठेतरी सहभागी आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान प्रकरणामध्ये निदा ही मतीन पटेलच्या घरात सापडली. तिच्यासेाबत तिचे आई, मावशी, भाऊ, वडील सुद्धा होते. जवळपास 35 दिवस ती तिथे मुक्कामी होती. चौकशीमध्ये ते घर मतीन पटेल यांचे आहे हे समोर आले. त्यावर मनपाने कारवाई करत त्यांना नोटीस बजावली आहे. एखादे अतिक्रमण पाडतांना नोटीस देत कागदपत्रे मागूण घेणं आणि ते जर अनाधिकृत असेल तर कारवाई करत असतात. हे लोकं एकीकडे घर माझे नाही असे म्हणतात तर दुसरीकडे घर पाडू नका म्हणून कोर्टात जात आहेत, ही दुटप्पीपणा त्याच्या अंगलट येणार आहे. मनपा आज कारवाई करेल असे मला वाटते.
संजय शिरसाट म्हणाले की, निदा खान एक पेड वर्कर आहे अशा अनेक निदा खान महाराष्ट्रामध्ये आहेत. हे काही छोटे प्रकरण नाही. धर्मांतराची एक मोहिम एमआयएमने इतरांच्या साथीने राबवली आहे. लव्ह असो की धर्मांतर असो की ड्रग्जचा विषय असो यामध्ये माजी खासदार जलील आणि त्यांची गँग सहभागी आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर जलील जेलमध्ये जाणार असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, औवेसीला कायदा कळत नाही का? एफआय आर फाटला म्हणजे तो व्यक्ती आरोपी होतो. तो आरोप सिद्ध झाला की कोर्टात शिक्षा होत असते, म्हणून आरोपीला मोकळे सोडता येत नाही. अनेक आरोपी आहेत ज्यांना शिक्षा झालेली नाही पण ते जेलमध्ये आहेत हे औवेसीला माहिती नाही का? धर्मांच्या नावाने इतर धर्मांच्या लोकांना बाटवण्साचे काम त्यांनी सुरू केले आहे, आता त्याचा छडा लागण्याशिवाय राहणार नाही.
संजय शिरसाट म्हणाले की, कोणत्याही नगरसेवकाने अतिक्रमण करू नये. करणाऱ्यांना पाठिंबा सुद्धा देऊ नये.कारण त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद सुद्धा रद्द होऊ शकते. हे काही एका पक्षासाठी नाही तर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना सांगणे आहे. त्यांनी या भानगडीत पडू नये.
Nashik jihad case linked to international racket, Nida Khan a paid worker”: Sanjay Shirsat alleges
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी