चार शासकीय यंत्रणांची फसवणूक; सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात!

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यात महापालिकेच्या निकालानंतर राज्यात मुंबईच्या मुंब्र्यातील एमआयएमच्या विजयी उमेदवार सहर शेख यांची जोरदार चर्चा झाली.प्रचार सभेतील भाषणाची शैली आणि डायलॉगबाजी मुळे सहर शेख यांनी राज्यात लोकप्रियता मिळवली,मात्र शासकीय यंत्रणांची फसवणूक केल्याप्रकरणी सहर शेख अडचणीत आल्या आहेत.

नगरसेवक सहर शेख यांनी बनावट जातीचा दाखला मिळवून अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.सहर शेखने मुंबईतील शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले होते.सहर शेखने निवडणुकीदरम्यान चार यंत्रणांची फसवणूक केल्याचा आरोपानंतर त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.



अधिक माहितीनुसार,उत्तरप्रदेशमधील गाझियाबादमधिल रहिवासी युनुस इकबाल शेख मुंबईत स्थायिक झाले.फक्त मागास प्रवर्गासाठी असणारा नमुना ८ वापरून अधिकाऱ्यांची फसवणूक करून त्यांनी बनावट जातीचा दाखला काढून घेतला, सहर शेख यांनी देखील मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवून पुढे निवडून लढल्या.

प्रकार उघडकीस कसा आला?

सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख याचा जात दाखला पुन्हा तपासून घेण्यात यावा यासाठी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.स्थलांतरित नागरिकांना नमुना १० लागू असताना नमुना ८ वापरून संबंधित अधिकाऱ्यांची फसवणूक बनावट दाखला मिळवला, तर त्यानंतर सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवलेल्या जात दाखल्याची चौकशीची मागणी सिद्दिकी अहमद यांनी केली आहे.तहसीलदारांना मिळालेल्या तक्रारीनुसार १८ मार्च रोजी पार पडलेल्या सुनावणीत युनुस शेख आजारपणाचे कारण पुढे करत गैरहजर होते.पुढच्या २३ मार्चच्या सुनावणीत तहसीलदारांनी सहर शेख चा जात प्रमाणपत्रात अनेक त्रुटी काढल्या.

शासकीय यंत्रणांची फसवणूक केल्याप्रकरणी सहर शेख अडचणीत आल्या आहेत,त्यामुळे त्याचं नगरसेवक पद जाणार का?या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Fraud of four government agencies; Sahar Sheikh’s corporator position in jeopardy!

महत्वाच्या बातम्या