विशेष प्रतिनिधी
पुणे: जिल्हा परिषदेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सभापतींनी खासगी आर्किटेक्ट बोलावून स्वतःच्या दालनाचे नूतनीकरण करून घेतल्याने प्रशासनात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बांधकाम विभागाच्या सभापतींना आपल्याच विभागावर विश्वास नसल्याच्या यातून स्पष्ट होत आहे.नव्या पदाधिकाऱ्यांच्या आसन व्यवस्थेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दालनाची व्यवस्था नियोजनाप्रमाणे केली होती.
अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या दालनाची सजावट,फर्निचर आणि इंटेरियर हे सर्व नियमांना धरून करण्यात आले होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी कोणताही आक्षेप न घेता त्यांचा सुनियोजित दालनात पदभार स्वीकारला.
कडाक्याच्या उन्हात १२ ते ४ कामगारांना सक्तीची विश्रांती द्यावी लागणार
बांधकाम सभापतींचा निर्णय चर्चेत…
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या सभापतींनी प्रशासनाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवला नाही.बांधकाम विभाग सभापतींनी स्वतःच्या पसंतीनुसार दालनात सजावट,इंटेरियर करण्याचा निर्णय घेतला.जिल्हा परिषदेच्या अधिकृत आर्किटेक्ट आणि अभियंत्यांनी प्रयत्न देखील केले,मात्र नियम डावलून खासगी व्यक्तीकडून दालनाचे इंटेरियर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा आणि खातेवाटपानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला.सभापतींना पदग्रहण करण्यासाठी घेऊन गेलेल्या अधिकाऱ्यांचा ही बाब लक्षात आली. इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनापेक्षा बांधकाम विभागाच्या सभापतींच्या दालनातील इंटेरिअर ही पूर्णपणे वेगळे दिसत असल्याने प्रशासनाकडे चौकशी करण्यात आली.हे काम जिल्हा परिषदेच्या अधिकृत कंत्राटदाराकडून न करून घेतला खासगी व्यक्तीकडून करून घेतल्याचे समोर आले.
जिल्हा परिषदेतील काम खासगी व्यक्तीकडून करून घेण्यास परवानगी आहे का?त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी कुठून आला?याबाबत आता चर्चा रंगली असून,अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Arbitrary management of Zilla Parishad Construction Chairman; No trust in his own department?
महत्वाच्या बातम्या