माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटलांचे नरेंद्र मोदींना खास पत्र! ‘ नारीशक्ती विधेयकाचं”भरभरून कौतुक..

विशेष प्रतिनिधी

पुणे:भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या ऐतिहासिक अंमलबजावणीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या पत्रामधून त्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले आहे.

प्रतिभा पाटील यांनी आपल्या पत्रात म्हणाल्या की, हा कायदा देशातील महिलांना अधिक सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. विधिमंडळांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढल्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक संवेदनशील, संतुलित आणि सर्वसमावेशक होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. महिलांचा वाढता सहभाग केवळ धोरणनिर्मितीला नवा दृष्टिकोन देणार नाही, तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकट करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



विशेषतः ग्रामीण आणि वंचित घटकांतील महिलांसाठी हा कायदा मोठी संधी निर्माण करणारा ठरेल, असे पाटील यांनी सांगितले. या माध्यमातून महिलांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या राष्ट्रनिर्मितीत अधिक सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करत पुढे येणाऱ्या महिलांसाठी हा कायदा प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व नेते, धोरणकर्ते आणि संबंधित घटकांचेही प्रतिभा पाटील यांनी कौतुक केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाला प्रत्यक्षात आणण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी महत्वाचा उल्लेख केला.

पत्रात पुढे प्रतिभा पाटील म्हणाल्या की, हा ऐतिहासिक निर्णय भारताला अधिक समतोल, सशक्त आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यातही अशाच ठोस उपाययोजना राबविल्या जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Former President Pratibha Patil’s special letter to Narendra Modi! ‘Nari Shakti Bill’ highly appreciated..

महत्वाच्या बातम्या