विशेष प्रतिनिधी
पुणे : Katke मुळा – मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे हवेली तालुक्यातील शेतीवर होत असलेल्या परिणामांचा प्रश्न आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला.Katke
हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना दूषित पाणी मिळत असल्याची बाब समोर आली असून, मुळा-मुठा नदी प्रदूषित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमांनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असतानाही मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे.Katke
दरम्यान, सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढवण्यासाठी जायकाच्या सहकार्याने नवीन प्रकल्प राबवले जात असून ते २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असून या सांडपाण्यापैकी ६.२० टीएमसीवर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सांडपाणी थेट मुळा-मुठा नदीत सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होत आहे. नियमांनुसार सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया करूनच ते नैसर्गिक प्रवाहात सोडणे बंधनकारक आहे. अन्यथा दुप्पट दराने आकारणीसह दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेला सूचना देण्यात येत आहे असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.

Katke Flags Sewage Crisis, Pune & PCMC Face Action
महत्वाच्या बातम्या