विशेष प्रतिनिधी
पुणे: Santosh Jagdale’s daughter पहलगाम झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. जगदाळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.Santosh Jagdale’s daughter
संतोष जगदाळे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलगी असावरी जगदाळे हिला प्रशासनात नोकरी देण्याचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिला होता. या आश्वासनाची आज पूर्तता करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आदेशानंतर या असावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेत मध्ये नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.Santosh Jagdale’s daughter
पुणे महानगरपालिकेत असावरी जगदाळे हिला अधिकृतपणे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीमुळे जगदाळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.Santosh Jagdale’s daughter
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून शुभेच्छा
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले प्राण गमावणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी आहे. “संतोष जगदाळे यांच्या बलिदानाची जाणीव राज्याला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन कायम उभे राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, असावरी जगदाळे हिने शासनाचे आभार मानत ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. “वडिलांच्या आठवणी कायम सोबत आहेत. त्यांच्या नावाला शोभेल असे काम करण्याचा प्रयत्न करेन,” असे भावनिक शब्दांत तिने सांगितले.
या निर्णयामुळे शासनाने दिलेला शब्द पाळल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, जगदाळे कुटुंबाने सरकारकडून शब्द पाळण्याची भावना व्यक्त केली आहे.
Pahalgam terror attack victim Santosh Jagdale’s daughter gets job; Job appointment letter in Pune Municipal Corporation..
महत्वाच्या बातम्या
- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा
- भाजपचे मिशन तमिळनाडू, सुपरस्टार विजय यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!
- Ambadas Danve ठोकून काढू, कापून टाकू’ म्हणत अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी
- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ, मुख्यमंत्र्यांचा विश्वास