विशेष प्रतिनिधी
पुणे: Pune Municipal चार वर्षाच्या प्रशासन राजवटीनंतर आता पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीतील विविध दालनांच्या नूतनीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, यावर होणाऱ्या अवाढव्य खर्चामुळे पालिकेत चर्चेला उधाण आले आहे. चार वर्ष प्रशासन कार्यरत असल्याने राजकीय पक्षांचे मुख्य कार्यालय व समित्यांचे कार्यालय बंद होते. निवडणुका नंतर आता सर्वपक्षीय मुख्य कार्यालयांसह महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या दालनांचा ‘कायापालट’ करण्यासाठी आतापर्यंत दीड कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.Pune Municipal
महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या केबिनची सफेदी, पॉलिशिंग आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. यासोबतच फर्निचरची दुरुस्ती, नवीन टाइल्स बसवणे आणि स्वच्छतागृहांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. आगामी काळात नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने, नागरिक आणि लोकप्रतिनिधींसाठी प्रशस्त सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.Pune Municipal
- तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्रह्मवाक्य नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
विशेष म्हणजे, सध्या ‘मार्च एंड’चे दिवस असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत दोन स्वतंत्र बिले काढली आहेत. यात:
पहिले बिल: ४५ लाख रुपये
दुसरे बिल: १७ लाख रुपये
उर्वरित वाढीव खर्च पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पातून (Budget) वळता केला जाणार असल्याचे समजते. एकूण खर्च दीड कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज असल्याने, इतक्या मोठ्या रकमेच्या तरतुदीवर पालिकेच्या गोटात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी?
एकीकडे शहरात मूलभूत सोयीसुविधांसाठी निधीची ओरड होत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या दालनांच्या सजावटीवर कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासकीय सोयीसाठी हे नूतनीकरण गरजेचे असल्याचे सांगितले जात असले तरी, खर्चाचा हा ‘आकडा’ सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.
Pune Municipal Corporation’s ‘Renovation’ Spree: Crores Wasted on Leaders’ Offices?
महत्वाच्या बातम्या