विशेष प्रतिनिधी
पुणे: जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज होत आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, कोणत्या तालुक्याला झुकते माप मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याची जोरदार चर्चा रंगली आहे. नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून, त्यात सभापती निवडीचे एक संभाव्य सूत्र (फॉर्म्युला) ठरवण्यात आले आहे. Pune Zilla Parishad
या तालुक्यांना मिळणार संधी?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे समतोल प्रतिनिधित्व राखण्यासाठी खालीलप्रमाणे जागांचे वाटप होऊ शकते
मावळ: १ सभापती पद निश्चित मानले जात आहे.
खेड किंवा जुन्नर: या दोन तालुक्यांपैकी एकाला संधी मिळेल.
शिरूर किंवा हवेली: यापैकी एका तालुक्याच्या पदरात सभापती पद पडू शकते.
भोर, वेल्हे किंवा मुळशी: या तीन तालुक्यांचा मिळून एकच मतदारसंघ असल्याने, यापैकी एकाला प्रतिनिधीत्व दिले जाईल.
हे तालुके शर्यतीतून बाहेर?
ज्या तालुक्यांकडे आधीच मोठी पदे आहेत, त्यांना या निवडीतून वगळले जाण्याची शक्यता आहे:
दौंड: अध्यक्षपद या तालुक्याकडे आहे.
आंबेगाव: उपाध्यक्षपद या तालुक्याकडे आहे.
इंदापूर व पुरंदर: मंत्रिपद आणि बँकेचे अध्यक्षपद असल्याने या तालुक्यांना डावलले जाऊ शकते.
बारामतीचा पेच आणि सुनेत्रा पवारांचा निर्णय
सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार बारामतीला वगळण्याचे संकेत असले, तरी बारामतीतील सदस्यांनी एक सभापती पद आपल्या तालुक्याला मिळावे, असा आग्रह धरला आहे. जर उपमुख्यमंत्री व सुनेत्रा पवार यांनी हा आग्रह मान्य केला, तर भोर किंवा मावळमधील एखाद्या तालुक्याची संधी हुकू शकते.
सव्वा-सव्वा वर्षांचा नवा नियम?
जिल्हा परिषदेत काम करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी म्हणून ‘सव्वा-सव्वा वर्षांचा कार्यकाळ’ निश्चित करण्याची मागणी आमदारांनी केली आहे. जर हा निर्णय लागू झाला, तर पाच वर्षांत एकूण २४ सदस्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
आता या बैठकीत ठरलेल्या सूत्रांनुसार कोणाची वर्णी लागते, हे काही वेळातच स्पष्ट होईल.
Pune Zilla Parishad Chairperson Selection: Who Will Get the Chance? Read the New Power Formula!
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर