विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील सुरक्षित गॅस पुरवठा अधिक व्यापक करण्याचा दृष्टीने पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड संदर्भात महत्वाची आढावा बैठक घेण्यात आली.महापौर मंजुषा नागपुरे यांचा अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीत शहरात सध्या सुरू असणाऱ्या गॅस पाइपलाइन कामाचा आढावा घेण्यात आला. MNGL
या बैठकीत MNGL वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागामध्ये सुरू असलेल्या पाइपलाइन टाकण्याचा कामाची सध्याची परिस्थिती,आत्तापर्यंतचे कव्हरेज आणि इथून पुढे भविष्यातील विस्तार आराखड्याची माहिती देण्यात आली.शहरातील वाढलेली लोकसंख्या आणि घरगुती गॅसची मागणी वाढली आहे.या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर गॅस पाइपलाइन नेटवर्क अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या भागात अद्याप MNGL सेवा पोहोचली नाही त्या भागात अगोदर गॅस पुरवठा करून देण्याचे निर्देश महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले.सध्या सुरू असलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष देत,रस्ते खोदकाम आणि वाहतूक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की,पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित,अखंड आणि सुलभ गॅस पुरवठा उपलब्ध उपलब्ध करून देण्याची महानगरपालिकेची प्राथमिकता आहे.MNGL आणि महानगरपालिका यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून काम लवकरात लवकर पूर्ण केले जातील.
गॅस पाईपलाईन टाकताना सुरक्षा निकषांचे पालन करणे,आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणा उभारणे ह्यासाठी मोहीम देखील राबवण्यात येणार आहे.
Review meeting regarding MNGL held in Pune Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर