विशेष प्रतिनिधी
पुणे: आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून पुण्यातून नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एक जागा पुण्याला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील इच्छुक नेत्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
तर पुण्यातून नीलम गोऱ्हे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. पक्षनिष्ठा, संघटन आणि दीर्घ राजकीय अनुभव या बळावर त्यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे.मात्र,एकनाथ शिंदे यांच्या निर्णयशैलीकडे पाहता अंतिम क्षणी अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
या नावांची चर्चा..
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांचे नाव चर्चेत आहे.शहरातील प्रश्नांची जाण असणारे आणि आक्रमक चेहरा म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे.त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.सोबतच नुकताच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केले डॉ.रोहित टिळक यांना देखील युवा चेहरा म्हणून संधी दिली जाऊ शकते,तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांचे नाव देखील स्थानिक पातळीवर पुढे येत आहे.
दरम्यान,एकनाथ शिंदेच्या शिसेनेतील इच्छुकांनी मुंबईत एकनाथ शिंदेसह वरिष्ठ नेत्यांचा भेटी घेऊन लॉबिंग सुरू केली आहे.त्यामुळे पुण्यातील इच्छुक उमेदवारांचा विचार एकनाथ शिंदेकडून केला जातो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.