
Sanjay Shirsat : अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….”पार्थ पवार प्रकरणावरून संजय शिरसाट यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे चुलत भाऊ असल्याने त्यांच्या जमीन घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. महायुतीतील इतर मंत्र्यांवर तुटून पडणारे रोहित पवार यांच्यावर यावरुन समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे. “अरे…रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली….” असे ट्विट शिरसाट यांनी केले आहे.




































