Malhar Mutton मल्हार मटण काय राष्ट्रीय प्रश्न आहे का? शरद पवार यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. मल्हार मटण Malhar Mutton काय राष्ट्रीय प्रश्न आहे का? राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला .

मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी हिंदू मटण विक्रेत्यांना मल्हार मटण सर्टिफिकेट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पवार म्हणाले, सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. कडक कारवाई करावी.

बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो. आज जी अवस्था आहे. ती कधीच नव्हती. सर्व घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा हा माझा अनुभव आहे. मी स्वत: त्या भागावर लक्ष देत होतो. मी बीडबाबत निर्णय घेतले आहेत. सहा सहा सदस्य तिथून आमदार म्हणून निवडून आणले आहेत. बीडमध्ये काही दुष्परिणाम दिसत आहेत. माझं स्वच्छ मत आहे कोण आहेत याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, त्यांच्या विरोधात कडक धोरण आखावं. बीडला वैभव प्रयत्न करून देण्याचा करावा, असे आवाहनही पवार यांनी केले.

निवडणुका होत असतात. लोक भेटत असतात. पण मी व्यक्तीश: काय करायचं ते ठरवलं नाही, असेही त्यांनी सांगितले.

Malhar Mutton a national issue? Sharad Pawar’s question

महत्वाच्या बातम्या