विशेष प्रतिनिधी
मुंबई: Nitesh Rane राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी विचारणा केली होती का? असा खोचक प्रश्न भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना विचारला आहे.Nitesh Rane
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही चुलत भाऊ एकत्र येण्याबाबत चर्चा चालू झाली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर चर्चा आणखी वाढली आहे.
नितेश राणे यांनी एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना “मनसेसोबत हात मिळवण्याआधी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी विचारणा केली का? हे उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे. अशा प्रकारच्या निर्णयात रश्मी ठाकरे यांच्या सल्ल्याला फार महत्त्व आहे,” असे खोचक भाष्य राणे यांनी केले. राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फार टोकाचे मतभेद नव्हते, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांची जास्त अडचण रश्मी ठाकरे यांनाच होती. पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करायची असेल तर उद्धव ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची परवानगी घ्यावी लागेल. शिवसेना पक्षाला जे आतून ओळखतात ते माझ्या या मताला नाकारणार नाहीत, असा दावाही नितेश राणे यांनी केला.
भाजपाच्या नेतृत्त्वातील महायुतीने निवडणुकीत दमदार विजय मिळवला. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र आले तरी आमच्यावर काहीही परिणाम पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Did you ask Rashmi Thackeray? Nitesh Rane’s tricky question to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत