विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटरवर संशय व्यक्त केला आहे. या पर्यटकाचा व्हिडीओ समोर आला असून तोच संदर्भ देत या पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटर 100 टक्के संशय व्यक्त केला आहे .राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्या झिपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये ऋषी भट्ट हा पर्यटक झिपलाइनचा आनंद घेत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. तो झिपलाइनवर शूटिंग करत असताना खाली दहशतवादी पर्यटकांना गोळ्या घालत असताना दिसत आहे. याची पार्श्वभूमी सांगताना ऋषी भट्ट म्हणाले की, मला झिपलाइनवरील व्यक्तीवर संशय असून त्याल दहशतवाद्यांबद्दल काहीतरी माहिती असू शकते. मी झिपलाइनवर गेलो आणि तो “अल्लाह हू अकबर” असे तीन वेळा पुटपुटला. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
ऋषी भट्ट यांनी एका वृत्तसंस्थेला यासंदर्भात मुलाखत दिली आहे. झिपलाइनसाठी माझ्यापुढे नऊ लोक होते. त्या ऑपरेटरने या लोकांना शांतपणे झिपलाइनवर पाठवले, पण मी झिपलाइनवर येताच त्याने तीन वेळा “अल्लाह-हू अकबर” म्हटले आणि त्यानंतरच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावेळी माझ्या लक्षात आले नाही, पण हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 एप्रिलला जेव्हा मी अहमदाबादला पोहोचलो आणि संध्याकाळी माझ्या कुटुंबासह बसून व्हिडिओ पाहत होतो, तेव्हा माझ्या ते लक्षात आले, असे त्यांनी सांगितले.
ऋषी भट्ट हे 22 एप्रिल रोजी दुपारी आपल्या कुटुंबासह पहलगामला पोहोचले. तेथे त्यांनी व्हिडीओ बनवले आणि काही फोटोही काढले. तोपर्यंत तिथले वातावरण ठीक होते. त्यानंतर त्यांनी झिपलाइनचे तिकीट घेतले. त्यांच्या तीन-तीन जणांची दोन कुटुंबे होते. त्यानंतर, आमचा नंबर होता. माझी पत्नी आणि मुलासह इतर सर्वजण खाली पोहोचले होते. त्याच्या समोरच दहशतवाद्यांनी काही लोकांना गोळ्या घातल्या होत्या. त्या झिपलाइन ऑपरेटरलाही एनआयएने चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगण्यात येते.
Zipline operator suspected in Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती