विशेष प्रतिनिधी
लोणावळा : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कारला लोणावळ्यातील जयचंद चौकामध्ये अपघात झाला. त्यांची आर्टिका गाडी बाजारपेठेत जात असताना एका दुचाकीस्वाराने गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
अपघातानंतर दुचाकीस्वाराने रावसाहेब दानवे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक रिक्षाचालकांनी हस्तक्षेप करत मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.
रावसाहेब दानवे हे कामानिमित्त लोणावळा बाजारपेठेत आले होते. अपघातानंतर ते स्वतःही घटनास्थळी उपस्थित होते. दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून, अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
Raosaheb Danve car met with an accident in Lonavala
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती