विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पहलगाम तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य जनगणनेतच जातनिहाय जनगणना केली जाईल. यापूर्वी 1931 साली जातीय जनगणना झाली होती.
बुधवारी झालेल्या सीसीपीए बैठकीत मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेसवर हल्लाबोल करताना अश्वीनी वैष्णव म्हणाले की, काँग्रेस सरकारने प्रत्येकवेळी जातीय जनगणनेला विरोध केला आहे. १९४७ पासून जातीय जनगणना झालेली नाही. काँग्रेसने जातीय जनगणनेऐवजी जातीय सर्वेक्षण केले. यूपीए सरकारच्या काळात अनेक राज्यांनी राजकीय दृष्टिकोनातून जात सर्वेक्षण केल्याचे वैष्णव म्हणाले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केवळ स्वतःच्या फायद्यासाठी जातीवर आधारित जनगणना मर्यादित केल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी फक्त बिहारमध्येच जातीय जनगणना झाली होती. संपूर्ण देशात 1931 साली जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर आता पुन्हा संपूर्ण देशभरात जातीय जनगणना केली जाणार आहे.
जातीय जनगणनेशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. ऊसाचा एफआरपी वाढवण्यात आला आहे. तसेच शिलाँगहून सिल्व्हर कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने मेघालय ते आसाम पर्यंतचा एक नवीन महामार्ग मंजूर केला आहे, जो १६६.८ किमी लांबीचा ४-लेन महामार्ग असेल अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
Caste-wise census to be conducted across the country, decision taken in Union Cabinet meeting
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती