विशेष प्रतिनिधी
जालना : केंद्र सरकारने घेतलेल्या संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला आहे. कोणत्या जातीने ओबीसी आरक्षण खाल्ले ते समजेल असे ते म्हणाले.
ही जनगणना करण्याची काही गरज नव्हती, पण सरकारने निर्णय घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. इंग्रजांनी केलेल्या जनगणनेनंतर पुन्हा जनगणना झालीच नाही. त्यामुळे आता हे पाऊल उचलणे योग्यच आहे, असे सांगून जरांगे यांनी या जनगणनेमुळे मराठा समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी जनगणना करणे आवश्यक नाही. कारण बार्टी आयोगाच्या शिफारसी जर सरकारने मंजूर केल्या तरी मराठा समाजाला न्याय मिळू शकतो. पण सरकारला इच्छा असेल तर निष्पक्षतेने ही जनगणना नक्की करावी, असे ते म्हणाले.
या प्रक्रियेत निष्पक्ष आणि जातीवादी नसलेले अधिकारी असावेत. बळजबरीने किंवा पक्षपाती नोंदी करणाऱ्यांना रोखले गेले पाहिजे. कोणतीही जातीय भेदभावाची भावना ठेवून जनगणना होता कामा नये. तसेच, सरकारने आता आरक्षणाचा कोटा वाढवण्याचीही गरज आहे, असे जरांगे म्हणाले.आयोग नेमताना चांगले अधिकारी नेमावेत. प्रक्रिया पारदर्शक हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.
Census will tell us how much OBC reservation was consumed by whom, Manoj Jarange Patil supports caste census
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती