विशेष प्रतिनिधी
मुंबई : जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे समाजिक न्यायाचे नवे पर्व सुरु झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. Devendra Fadnavis
गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत होती. आता केंद्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जातीनिहाय जनगणनेचे स्वागत करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदी सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. भारतात १९३१ नंतर पहिल्यांदा जातनिहाय जनगणना होणार आहे. याआधी मनमोहन सिंग यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करणार असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळामधून विरोध झाल्यामुळे त्या निर्णयाला त्यांनी एसीसीमध्ये त्यांनी बदललं आणि जातनिहाय जनगणना करण्याऐवजी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्व्हे केला. पण त्याचेही आकडे कधीच प्रकाशित झाले नाहीत.
शेवटच्या घटकापर्यंत जर सामाजिक न्याय पोहोचवायचा असेल तर जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजात कोण मागे राहिलेलं आहे. याचा इम्पिरिकल डेटा देखील समोर येईल. त्यामुळे आपल्याला योग्य लोकांना योग्य सवलती देऊन या देशातील समाजांना पुढे घेऊन जाता येईल. या अनुषंगाने हा ऐतिहासिक निर्णय आहे”, असंही फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadnavis
Caste-wise census will usher in a new era of social justice, believes Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती