विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा आणखी एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. दिल्ली सरकारच्या १२,७४८ वर्गखोल्यांच्या बांधकाम प्रकल्पात तब्बल २,००० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला असून, या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. Manish Sisodia and Satyendra Jain
ACB प्रमुख मधुर वर्मा यांनी सांगितले की, केंद्राच्या दक्षता आयोगाच्या मुख्य तांत्रिक परीक्षकांनी (CTE) २०२० मध्येच या प्रकरणात गंभीर आर्थिक अनियमितता दाखवणारा अहवाल सादर केला होता, मात्र तो तीन वर्षांपर्यंत दबवून ठेवण्यात आला. Manish Sisodia and Satyendra Jain
२०१५–१६ मध्ये प्रकल्पाचा खर्च ठरवून २०१६ पर्यंत काम पूर्ण करायचे ठरले होते, पण एकाही शाळेचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. नियमबाह्य पद्धतीने सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली, तर निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्चवाढ झाली. ८६०.६३ कोटी रुपयांची मूळ निविदा १७% ते ९०% पर्यंत वाढवून ३२६.२५ कोटी रुपये अधिक खर्च करण्यात आले, त्यापैकी २२५ कोटी रुपये केवळ ‘दर्जेदार साहित्य’ वापरल्याच्या नावाखाली लाटले गेले.
पाच शाळांमध्ये तब्बल ४२.५ कोटी रुपयांचे काम थेट जुन्या कंत्राटांतून देण्यात आले, कोणतीही नवीन निविदा न मागता — जे पूर्णपणे नियमबाह्य आहे. तसेच, SP (स्पेशल प्रायोरिटी) वर्गखोल्यांचा खर्च प्रति स्क्वेअर फूट २,२९२ रुपये इतका झाला, जो पारंपरिक पक्क्या इमारतींच्या खर्चाइतका आहे. त्यामुळे पर्यायी बांधकाम पद्धतीमुळे आर्थिक बचतीऐवजी सरकारी निधीचा मोठा अपव्यय झाला.
या सगळ्या प्रकाराची चौकशी करून ACB ने आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७-अ अंतर्गत आवश्यक मंजुरी घेऊन एफआयआर दाखल केला आहे.
हा घोटाळा समोर आल्याने आम आदमी पक्षाच्या तथाकथित ‘प्रामाणिक राजकारण’च्या दाव्यांना मोठा धक्का बसला आहे.
Another corruption of AAP exposed, case registered against Manish Sisodia and Satyendra Jain in Rs 2,000 crore classroom scam
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती