विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे हे राज्यात सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे उत्कृष्ट जिल्हाधिकारी ठरले आहेत. Maharashtra state
नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी राज्यात दुसरे तर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल यांनी प्रत्येकी ७५.४३ असे एकसमान गुण मिळवत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
राज्य सरकारने राज्यातील सर्व विभागांसाठी राज्यात १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात कार्यालयीन सुधारणांवर भर देण्यात आला होता. या कार्यक्रमातील कामगिरीचे भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने (Quality Council of India) नुकतेच अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात विभाग आणि कार्यालयनिहाय गुणानुक्रमे पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या १०० दिवसांच्या कार्यक्रमात संकेतस्थळ (वेबसाईट) सुधारणा, कार्यालयीन सोयी-सुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी प्रमुख मुद्द्यांसह विविध १० मुद्यांवर भर देण्यात आला होता.
महाराष्ट्र दिनानिमित्त दि. १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निकाल एक्स या सामाजिक माध्यमाद्वारे जाहीर केला आहे. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अधिकाऱ्यांचे ‘एक्स’वरून कौतुक केले आहे.
- राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच झेडपी सीईओ’
श्री. रोहन घुगे (९२ गुण, प्रथम) — ठाणे जिल्हा परिषद.
श्री. विनायक महामुनी (७९.४३ गुण, द्वितीय) — नागपूर जिल्हा परिषद
श्री. गजानन पाटील (७५.४३ गुण, तृतीय व पुणे विभागात प्रथम) —- पुणे जिल्हा परिषद
श्रीमती अशिमा मित्तल ( ७५.४३ गुण, तृतीय) —- नाशिक जिल्हा परिषद.
श्री. वैभव वाघमारे (७२ गुण, चतुर्थ क्रमांक) —- वाशीम जिल्हा परिषद
- राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी
श्री. विनय गौडा (८४.२९ गुण, राज्यात प्रथम) — जिल्हाधिकारी चंद्रपूर.
श्री. अमोल येडगे (८१.१४, द्वितीय ) —- जिल्हाधिकारी कोल्हापूर.
श्री. आयुष प्रसाद (८०.८६, तृतीय) — जिल्हाधिकारी जळगाव.
श्री. अजित कुंभार (७८.८६, चतुर्थ क्रमांक) —- जिल्हाधिकारी, अकोला.
श्री. राहूल कर्डिले (६६.८६, पाचवा क्रमांक), जिल्हाधिकारी, नांदेड
The five best ZP CEOs in the Maharashtra state
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती