विशेष प्रतिनिधी
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले आहे. त्यांना शनिवारी, ३ मे रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणात लय भारी युट्युब चॅनलचा पत्रकार तुषार ऊर्फ तात्यासोआ आबाजी खरात (मूळ रा. पांढरवाडी, ता. माण, सध्या रा. मुंबई) याला दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. खरात याने “बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन” अशी धमकी दिल्याचा आरोप मंत्री गोरे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, खरातने सोशल मीडियावर मंत्री गोरे यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक बदनामीकारक पोस्ट केल्या. तसेच, त्याने गोरे यांचे निकटवर्तीय बळवंत पाटील यांना मुंबईत बोलावून हे प्रकरण मिटवण्यासाठी ५ कोटींची मागणी केली. त्यातील १ कोटी रुपये तक्रार करणाऱ्या महिलेला देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.
या प्रकरणातील महिलेने देखील गोरे यांच्याविरोधात खोटे आरोप करून ३ कोटींची मागणी केली होती. १ कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना या महिलेला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात यापूर्वीही माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांची नावे चर्चेत आली होती. आता रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावण्यात आले आहे.
Jaykumar Gore defamation case Ramraje Naik Nimbalkar summoned by Vaduz police
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती