विशेष प्रतिनिधी
किशनगंज : Owaisi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने कारवाई केल्यास, बांगला देशकडून भारताच्या ईशान्येकडील सातही राज्यांवर कब्जा करण्याचे वक्तव्य बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकारी आणि बांग्ला देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचे सहकारी ए. एल. एम. फजलुर रहमान यांनी केले होते. या वादग्रस्त विधानावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. बांगला देशाने लक्षात ठेवावे की, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व भारतामुळेच शक्य झाले आहे. १९७१ मध्ये भारताच्या मदतीमुळेच बांगलादेश स्वतंत्र झाला.”Owaisi
किशनगंज येथील सभेते बाेलतान पाकिस्तानवरही निशाणा साधताना ओवैसी म्हणाले, पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र आहे. भारत नेहमीच पाकिस्तानपेक्षा मजबूत राहणार. पाकिस्तान आपल्या देशातील विविध वांशिक समूहांमध्ये शांतता राखू शकत नाही, तसेच त्याचे इराण व अफगाणिस्तानसारख्या शेजाऱ्यांशीही संबंध चांगले नाहीत.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी करत ओवैसी म्हणाले, भारत सरकारने आर्थिक कारवाई करावी. पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय दिला आहे. म्हणून त्याला ‘फायनांशियल अॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकावे . पंतप्रधान मोदी सरकारने पाकिस्तानच्या जहाजे आणि विमाने यांच्यावर निर्बंध घालणे योग्य निर्णय असल्याचे सांगतानाच, आणखी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अलीकडेच भारतविरोधी विधाने केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले, “भारतातील मुस्लीमांनी १९४७ मध्येच जिन्नांना नाकारले होते. आम्ही भारतात राहायचे ठरवले होते आणि आमची पुढची पिढीही हेच करेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मातृभूमी सोडणार नाही.
Your independent existence is because of India, Owaisi’s attack on former Bangladesh army officer
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा