विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा (Hsc) निकाल उद्या ( ५ मे ) ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
निकाल पाहण्यासाठी..
* बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
* क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
* या निकालाची प्रत डाऊनलोडही करता येऊ शकते
Class 12th online results to be announced tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती