S. Jaishankar आम्हाला मित्र हवे आहेत, उपदेश देणारे नको, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा युरोपला स्पष्ट संदेश

S. Jaishankar आम्हाला मित्र हवे आहेत, उपदेश देणारे नको, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा युरोपला स्पष्ट संदेश

S. Jaishankar

विशेष प्रतिनिधी

लंडन : भारताला मित्र हवे आहेत, केवळ उपदेश देणारे नको. विशेषतः असे उपदेशक जे स्वतःच्या देशात जे करत नाहीत, ते भारताला करायला सांगतात, असा स्पष्ट संदेश परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर युरोपला दिला आहे.

आर्क्टिक सर्कल इंडिया फोरममध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदलत्या समीकरणांमध्ये भारताची भूमिका स्पष्ट करताना जयशंकर म्हणाले, “भारताला भागीदारांची गरज आहे, उपदेशकांची नव्हे — भारत-युरोप संबंध दृढ व्हायचे असतील, तर युरोपने समजूतदारपणा आणि परस्पर हितसंबंध दाखवले पाहिजेत.

भारताला साथ देणारे देश हवे आहेत, केवळ टीका करणारे नव्हे. काही युरोपीय देश अजूनही वास्तवात जगण्याचे धडे घेत आहेत. काहींची पावले पुढे पडली आहेत, काहींची थोडीशी मागे आहेत. पण जर भागीदारी हवी असेल, तर समज, संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंधांची जाणीव असावी लागते.”

‘रशिया रिअॅलिझम’ आणि भारताचे धोरण

भारत आणि रशियामधील संबंधांबाबत बोलताना रशिया रियालिझम संकल्पनेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले, “भारत आणि रशिया हे पुरवठादार आणि ग्राहक म्हणून एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. त्यामुळे हे संबंध स्वाभाविक आणि परस्पर पूरक आहेत.रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताने रशियाशी संवाद कायम ठेवला. पश्चिमी देशांच्या टीकेनंतरही रशियन क्रूड तेलाची खरेदी वाढवली.

भारत अमेरिकेशी आदर्शवादी भूमिकेतून नव्हे तर नव्हे एकमेकांना पूरक ठरतील असे संबंध प्रस्थापित करण्याच्या विचाराचा आहे. वास्तववादी दृष्टिकोनातून विचार केला तर दोन्ही देशांमध्ये अनेक मार्गांनी सहकार्य वाढविले जाऊ शकते.

External Affairs Minister S. Jaishankar’s clear message to Europe

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023