विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम येथे हिंदूंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण असतानाही काँग्रेसकडून भारतीय लष्कराचा अपमान करणारी विधाने केली जात आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी राफेल लढाऊ विमानांवर लिंबू आणि मिरची लावल्याचा उपहासात्मक दावा करून भारतीय वायुदलाची खिल्ली उडवली. या वक्तव्यानंतर काँग्रेसवर चौफेर टीका होत आहे. Ajay Rai
अजय राय यांनी दावा केला की, केंद्र सरकारने आणलेल्या राफेल लढाऊ विमानांचा वापर होत नसून ती केवळ हँगरमध्ये उभी आहेत. त्यांना “लिंबू आणि मिरची” लावलेली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एक खेळण्याचे विमान ‘राफेल’ म्हणून दाखवले आणि त्याला लिंबू-मिरची बांधून सरकारवर टीका केली. Ajay Rai
अजय राय म्हणाले, हे सरकार फक्त बोलते, म्हणते की दहशतवाद्यांचा खात्मा करणार, राफेल आणलं – पण ते हँगरमध्ये उभं आहे आणि त्याला लिंबू-मिरची लावलेली आहे.
अजय राय यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, संरक्षण दलांवर अशा प्रकारे विनोद करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणा असल्याचे मत विविध नेत्यांनी व्यक्त केले आहे.
भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, “जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा संपूर्ण देश एकत्र उभा राहतो. मात्र, काँग्रेस पक्ष दहशतवादी हल्ल्याचं गांभीर्य न समजता लष्कराची थट्टा करतो. हे केवळ लष्कराचा अपमान नाही, तर देशाच्या सुरक्षिततेचा अपमान आहे.”
सामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर काँग्रेसवर संताप व्यक्त केला असून, “राफेल हे देशाचे अभिमानाचे प्रतिक आहे, त्यावर अशी वक्तव्ये करणाऱ्या अजय राय यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी होत आहे.
लष्कराच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही अजय राय यांच्यावर नाराजी व्यक्त केली. “हे केवळ राजकारण नाही, तर सैनिकांच्या बलिदानाचा अपमान आहे,” असे मत काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना मांडले.
विशेष म्हणजे काँग्रेसच्या अशा विधानांचा वापर पाकिस्तानी नेतेही करत असून त्यांनी याचा आधार घेत भारताविरोधात खोटे प्रचार सुरु केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Congress faces criticism for controversial statement on Army; Nationwide anger against Ajay Rai
महत्वाच्या बातम्या
- Narhari Zirwal लाडक्या बहिणी 1500 रुपयांत खुश, 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, नरहरी झिरवाळ यांचा दावा
- Bopdev Ghat : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
- Devendra Fadnavis : शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- Devendra Fadnavis : महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती