विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Vijaya Rahatkar पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी त्यांच्या एका वक्तव्यावरून ट्राेलर्सची शिकार झाल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर हिमांशी नरवाल यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असून ट्राेलींग सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.Vijaya Rahatkar
२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी यांच्यासमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेनंतर, एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये हिमांशी तिचा पती विनयच्या मृतदेहाजवळ बसली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरातून हिमांशी यांना सहानुभूती मिळत हाेाती. मात्र, केवळ एका वक्तव्याने त्यांना प्रचंड ट्राेलींगचा सामना करावा लागला. १ मे रोजी हिमांशी म्हणाल्या हाेत्या की, लोक ज्या पद्धतीने मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध बोलत आहेत ते घडू नये. आम्हाला न्याय हवा आहे. ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
या विधानानंतर हिमांशीला ट्रोलिंग आणि शिवीगाळाचा सामना करावा लागला. यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हिमांशीचा बचाव केला. महिला आयोगाने कडक शब्दांत केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, एखाद्या महिलेला तिच्या अभिव्यक्तीच्या आधारे ट्रोल करणे चुकीचे आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील अनेक नागरिकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घातक हल्ल्यात लेफ्टिनंट विनय नरवाल यांना त्यांचा धर्म विचारून गोळी मारण्यात आली. या दहशतवादी घटनेने संपूर्ण देश अंत:करणाने शाेकमग्न आणि संतप्त झाला आहे. लेफ्टिनंट विनय नरवाल यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सौ हिमांशी नरवाल यांच्या एका विधानाच्या संदर्भात सोशल मीडियावर ज्यापद्धतीने त्यांना निशाणा बनवले जात आहे, ते अत्यंत निंदनीय व दुर्दैवी आहे. कोणत्याही स्त्रीच्या वैचारिक अभिव्यक्ती किंवा वैयक्तिक जीवनावर आघात करून तिला ट्रोल करणे कधीही स्वीकारार्ह नाही.कोणतीही सहमती किंवा असहमती सदैव शालीनतेच्या व संवैधानिक मर्यादांच्या आत व्यक्त केली जाणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय महिला आयोग प्रत्येक स्त्रीच्या गरिमा, प्रतिष्ठा व सन्मानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे.
हिमांशीला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही पाठिंबा दिला आहे. ओवैसी म्हणाले, दहशतवाद्यांनी आमची मुलगी हिमांशीचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आणि तरीही, तिच्या दुःखातही, तिने असे म्हटले की तिला आपल्या देशात मुस्लिम किंवा काश्मिरी लोकांबद्दल द्वेष निर्माण होऊ नये असे वाटत होते. मला आशा आहे की सरकार त्यांचे शब्द लक्षात ठेवेल. जे लोक द्वेष पसरवतात तेच लोक दहशतवाद्यांना समाधान देतात.
National Commission for Women stands behind Himanshi Narwal, a victim of TROLS
महत्वाच्या बातम्या
- Pakistan पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई; पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी
- Neelam Gorhe : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना चौकशीचे निर्देश
- Sonu Nigam : सोनू निगमवर गुन्हा दाखल, कन्नडमध्ये गाणे गायचा आग्रह अन् म्हणाला यामुळेच पहलगाममध्ये युद्ध झालं…
- Ajit Pawar : तर अजित पवार, एकनाथ शिंदे हाेऊ शकतात मुख्यमंत्री… संजय राऊत यांचा दावा