विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम! अशा आशयाच्या खाली भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे.
ठाकरेंनी ऑपरेशन सिंदूरबाबत भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.
भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम! असे उद्धव ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरेंनी त्यांचे बंधू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरात सूर मिळवला आहे. कारण राज ठाकरे यांनी हे एअर स्ट्राइक लोकांची दिशाभूल करण्यासाठी असल्यायचे म्हटले आहे. सरकारने या एअर स्ट्राइकऐवजी भारतातील दहशतवादी कोंबिंग ऑपरेशन करून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून काढले पाहिजे होते, असे राज ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, एअर स्ट्राईक करून लोकांचे लक्ष विचलित करणे किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही. सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवायलाच हव्यात, असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारचे नाव न घेता स्लिपर्स सेलविषयीचा मुद्दा मांडला आहे.
Uddhav Thackeray said, Shiv Sena salutes the bravery of the Indian Army
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत