विशेष प्रतिनिधी
पुणे : भारताच्या निर्णायक लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप घडताना दिसत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी व राजकीय व्यवस्थेत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तान सरकार व लष्करातील गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या कारभारावर आणि सीमा संघर्षाच्या वेळी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, असीम मुनीर यांची पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वाढली आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानमध्ये सत्तेच्या गडगडाटाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.
लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल शमशाद मिर्झा हे असीम मुनीर यांच्या जागी पुढचे लष्करप्रमुख म्हणून नेमले जाण्याची शक्यता आहे. ते सध्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपैकी एक असून, पाकिस्तानच्या संरक्षण धोरणांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे.
२२ एप्रिल रोजी भारतातील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर हवाई आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न झाला. मात्र भारताने सतर्कतेने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लष्कराला मोठा फटका दिला.
या पार्श्वभूमीवर असीम मुनीर यांच्यावर हल्ला रोखण्यात अपयश, आंतरराष्ट्रीय बदनामी, आणि लष्करी पातळीवरील निष्क्रियता यासारखे आरोप होत आहेत. त्यामुळेच त्यांच्या अटकेनंतर देशातल्या सैनिकी धोरणांवर पुन्हा एकदा पुनर्रचना होणार असल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पाकिस्तानच्या लष्कराची जागतिक पातळीवर प्रतिमा डागाळली असून, अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या यशस्वी लष्करी कारवायांनंतर पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात व लष्करी नेतृत्वात तीव्र उलथापालथ सुरू झाली आहे. पुढे काय घडते याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Pakistan Army Chief Asim Munir arrested on treason charges after Indian action
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत