भारत-पाकिस्तान तणावामुळे धर्मशाळा सामना रद्द, खेळाडूंसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था

भारत-पाकिस्तान तणावामुळे धर्मशाळा सामना रद्द, खेळाडूंसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था

Dharamshala IPL match

विशेष प्रतिनिधी

धर्मशाळा : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आयपीएल 2025 हंगामावर झाला आहे. गुरुवारी धर्मशाळा येथील एचपीसीए स्टेडियमवर होणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सुरू असलेला सामना तात्काळ रद्द करण्यात आला. बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सोशल मीडियावर पोस्ट करत याची अधिकृत घोषणा केली.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी तातडीने अलर्ट जारी केला होता. याच अनुषंगाने धर्मशाळा येथे सुरू असलेल्या सामन्यादरम्यान फ्लडलाइट्स अचानक बंद करण्यात आल्या आणि प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले. मैदानाबाहेर जाताना प्रेक्षकांनी “पाकिस्तान मुर्दाबाद” च्या घोषणा दिल्या.

बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले, “धर्मशाळातून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयोजक यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आम्ही विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. सध्या खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. उद्या (शुक्रवार) आयपीएलच्या पुढील कार्यक्रमाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.”

घटनाक्रमानंतर बीसीसीआयने आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तातडीची ऑनलाइन बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात निर्माण झालेल्या असुरक्षित वातावरणामुळे संपूर्ण IPL रद्द करण्याचा पर्याय देखील विचाराधीन आहे.

भारतभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे आगामी सामन्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषत: दिल्ली, मोहाली, जयपूर आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यांवर याचा परिणाम होऊ शकतो.

Dharamshala IPL match cancelled due to India-Pakistan tension, special train arranged for players

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023