विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM meets ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेला तणाव आणि युद्धाला तोंड फुटण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीडीएस आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांशी बैठक घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक घेतली आहे. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते.PM meets
या बैठकीमध्ये सध्याच्या परिस्थितीसह आगामी रणनीतीबाबत चर्चा झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.दरम्यान, पाकिस्तानने आज पुन्हा एकदा भारतातील सीमेलगतच्या विविध शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. उत्तरेतील बारामुल्लापासून दक्षिणेला भूजपर्यंत जवळपास २६ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. मात्र हे हल्ले भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावले आहेत.
पाकिस्ताने नागरी आणि लष्करी भागांना लक्ष्य करून हे हल्ले केले होते, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.याबाबत भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या अधिक माहितीनुसार बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फझिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भूज, कौरबेत आणि लाखी नाला, या ठिकाणांना आज पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
PM meets Ajit Doval, CDS and Chiefs of Army, Navy and Air Force
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित