Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी, दोषारोपपत्रावर विवेचन न केल्याचा आरोप, सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी, दोषारोपपत्रावर विवेचन न केल्याचा आरोप, सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rahul Gandhi स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सात्यकी सावरकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा अर्ज त्यांच्या वकीलांनी एमपी-एमएलए विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केला.Rahul Gandhi

सात्यकी सावरकर हे सावरकरांचे नातू असून त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याच प्रकरणात राहुल गांधी यांनी न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रावर वारंवार विवेचन करण्यास टाळाटाळ केली आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला चालढकल मिळत असल्याचे सात्यकी सावरकर यांच्या वतीने सांगण्यात आले. याच कारणामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या खटल्यात सात्यकी सावरकर यांनी सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक, त्यासंबंधी काही वर्तमानपत्रांतील कात्रणे आणि एक पेनड्राईव्ह पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली होती. तथापि, या कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाकडे देण्यात आल्या नव्हत्या. त्यासंदर्भात राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी अर्ज दाखल करत, या सर्व पुराव्यांची आणि विशेषतः ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती मागितली होती.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सात्यकी सावरकर यांचे वकील अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी बचाव पक्षाला ‘हिंदुत्व’ आणि ‘माझी जन्मठेप’ या दोन पुस्तकांच्या प्रती सुपूर्द केल्या. मात्र, इंग्रजी प्रत मिळाली नाही, त्यामुळे राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुन्हा इंग्रजी आवृत्तीची मागणी कायम ठेवली आहे.

दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी २८ मे रोजी होणार असून त्या दिवशी या मागण्यांवर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.

Satyaki Savarkar files an application in court demanding cancellation of Rahul Gandhi’s bail, allegation of not discussing the chargesheet

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023