विशेष प्रतिनिधी
मुंबई : prime minister modi परक्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात हस्तक्षेप करण्याचे दिवस गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हा ‘नवीन भारत’ आहे, असे मत व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मोदींचे आभार मानले आहेत.prime minister modi
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर वरुन आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात युद्ध बंदीच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरुन मिलिंद देवरा यांनी पलटवार करत विरोधकांना इशारा दिला आहे.
देवरा म्हणाले, भारत आता पूर्णपणे सज्ज आहे, सक्षम आहे आणि दहशतवाद्यांनाच नव्हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांनाही सडेतोड उत्तर देण्यास तयार आहे. जर शेजारी देश पुन्हा अशा प्रकारचा धाडस करण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना काय परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव त्यांना आहे.”
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या करारावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,”शिवसेना पक्षाच्या वतीने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, शूर भारतीय सैन्याचे आभार मानतो ज्यांनी कोणतीही किंमत लागली तरी भारताचे संरक्षण केले आणि या संघर्षात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधकांनी राजकारण करू नये. जर त्यांनी हे केले, तर त्याचा उलट परिणाम त्यांच्यावरच होईल, असा इशाराही मिलिंद देवरा यांनी दिला.
Gone are the days of foreigners interfering in India’s foreign policy, Milind Deora thanks the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित