विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : Sanjay Shirsat महाराष्ट्रातील संभाव्य राजकीय घडामाेडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची अवस्था ना घर का, ना घाटका झाली असल्याची टीका सामाज कल्याण मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केली आहे.Sanjay Shirsat
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर बाेलताना शिरसाट म्हणाले, उबाठा गटाने दोन्ही कॉंग्रेससोबत केलेली युती चुकीची होती, हे आम्ही आधीच सांगत होतो आणि त्याचा प्रत्यय आता त्यांना येत आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवाले तुमच्यासोबत राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगत होतो. आता जसे जसे त्यांचे भविष्य अंधारमय होत चालले आहे तसे आता ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीमधील फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते, पण ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे. त्यांनी एकत्र येणे काही नवीन नाही, असे शिरसाट म्हणाले आहेत.
संजय शिरसाट म्हणाले, कॉंग्रेस तरी उबाठा सोबत कुठे आहे? गेल्या चार महिन्यात कॉंग्रेससोबत त्यांची कोणती बैठक झाली? कधी त्यांनी यांना फोन केला किंवा त्यांनी यांना फोन केला? पुढील काळात उबाठा गटाला एकटेच चालावे लागणार आहे. आता एकटाच प्रवास त्यांना महागात पडणार आहे. ते हिंदुत्वाशी एकरूप राहिले नाही, महाविकास आघाडीत जाऊन देखील महाविकास आघाडी एकत्र ठेऊ शकले नाही. त्यांची आता ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली आहे.
अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत जातील की नाही माहित नाही. मी युतीबद्दल सांगत आहे. आम्हाला काय मिळणार हे आम्ही आता सांगू शकत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. त्यांचे एकत्र येणे हे काहीतरी संकेत देत आहेत. शरद पवार आमच्या सोबत येतील की अजित पवार यांचा नेतृत्व करतील हे सगळे प्रश्न आहेत. त्या राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करेल हा देखील प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ द्या, त्यानंतर समीकरणे काय ठरतात ते ठरवू. भाजप आणि शिवसेनेची युती पक्की आहे त्यात कोणतेही मतभेद नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर आम्ही छोटा भाऊ होऊ की मोठा भाऊ हा प्रश्न नाही. चंद्रबाबू नायडू आमच्यासोबत आले म्हणून त्यांच्यासोबत आमची युती झाली का? त्यांची प्रासंगिक काय युती आहे त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लाडकी बहीण योजनेवरही शिरसाट यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णय कायम राहील. त्यात आणखी काही बदल किंवा अपडेट करायचा असेल तर त्याचे स्वागत आहे. पण त्यांना आज जे काही मिळत आहे त्यात कपात होणार नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
The condition of the Thackeray group is bad , Sanjay Shirsat’s criticism
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित