विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या निर्णायक कारवाया, ऑपरेशन सिंदूरमधील यशस्वी कारवाई आणि त्यानंतर अचानक जाहीर करण्यात आलेल्या शस्त्रसंधीबाबत देशभरातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी सी-व्होटर संस्थेने नुकताच एक सर्वेक्षण केला. या सर्वेक्षणातून भारतीय लष्करावर देशवासीयांचा ठाम विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून, शस्त्रसंधीबाबतही आश्चर्यकारकरीत्या जनतेने सकारात्मक भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. C-Voter Survey
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले चढवत ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेनंतर देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अशा पार्श्वभूमीवर घेतलेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाचे जनमत काय आहे, याचा तपशीलवार अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला.
भारतीय लष्करावर किती विश्वास आहे, असा प्रश्न विचारल्यावर 91.1% नागरिकांनी “खूप विश्वास आहे” असे उत्तर दिले. केवळ 6.1% लोकांनी “काही प्रमाणात विश्वास आहे” असे म्हटले, तर “अजिबात विश्वास नाही” असे म्हणणाऱ्यांची संख्या केवळ 1% होती. विशेष म्हणजे, शस्त्रसंधीनंतर पुन्हा हाच प्रश्न विचारल्यावर लष्करावर विश्वास असणाऱ्यांचे प्रमाण वाढून 92.3% झाले आणि अविश्वास दाखवणाऱ्यांचे प्रमाण केवळ 0.7% वर घसरले.
युद्धसदृश वातावरणात अचानक जाहीर झालेल्या शस्त्रसंधीमुळे आरंभी काही प्रमाणात नाराजी दिसून आली होती. मात्र सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, 63.3% लोकांनी शस्त्रसंधीचे स्वागत केले. फक्त 10.2% लोकांनी त्याला विरोध दर्शवला, तर 17.3% नागरिकांनी कोणतेही मत नोंदवले नाही.
मोदी सरकारच्या पाकिस्तान विरोधातील कारवाईबाबत 68.1% नागरिक समाधानी असल्याचे सांगितले. फक्त 5.3% लोकांनी असमाधान व्यक्त केले, तर 15.3% लोकांनी आपले मत व्यक्त केले नाही.
“भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?” या प्रश्नावर शस्त्रसंधीपूर्वी 47.4% लोकांनी चीनचे नाव घेतले होते, तर 27.7% लोकांनी पाकिस्तानचे. 12.2% नागरिकांनी दोघांनाही शत्रू मानले होते. मात्र शस्त्रसंधी झाल्यानंतर चीनला शत्रू मानणाऱ्यांचे प्रमाण वाढून 51.8% झाले. पाकिस्तानच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण 19.6% इतके राहिले, तर दोघांनाही शत्रू मानणाऱ्यांची संख्या 20.7% पर्यंत पोहोचली.
C-Voter Survey Conclusion: Countrymen have strong faith in the Indian Army, also gave great support to the ceasefire
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित