नवी दिल्ली
Asaduddin Owaisi भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी आपली भूमिका मांडली असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतलेली राष्ट्रवादी भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. सामान्यतः केंद्र सरकारवर आणि विशेषतः भाजपवर टीका करणारे ओवेसी यांनी या वेळी पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट प्रहार करत भारताच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे.Asaduddin Owaisi
ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत ओवेसी यांनी संसदेत आणि पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाकिस्तानला हे समजून घ्यायला हवे की भारत आता १९४७ सालात नाही. जर आमच्यावर हल्ला झाला, तर त्याचे उत्तर सणसणीत मिळेल. भारताचे लष्कर आणि सरकार या देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे.”
मी पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक धोरणाशी सहमत नसेन, पण देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आम्ही सर्व एकत्र आहोत. मी पाकिस्तानी नेत्यांना सांगू इच्छितो की भारतातील मुस्लिम या देशावर प्रेम करतात, ते देशद्रोही नाहीत. पाकिस्तानला भारतातील मुस्लिमांची चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
ओवेसी यांच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावरही त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. अनेक युजर्सनी त्यांचे व्हिडीओ क्लिप्स शेअर करत, “हे आहे खरे देशभक्त नेते” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही राजकीय विश्लेषकांनीही नमूद केले की, “ओवेसी यांचा हा राष्ट्रवादी पवित्रा भारतीय मुस्लिमांचे विचार आणि भावना प्रकट करतो. देशावरील संकटाच्या प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकसंधपणे उभे राहणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.”
राजकीय वर्तुळात देखील ओवेसी यांच्या वक्तव्याची दखल घेतली जात आहे. भाजपमधील काही नेत्यांनीही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं असून, “राजकारण वेगळं आणि राष्ट्रप्रेम वेगळं असतं. ओवेसी यांनी दोघांमधला फरक सिद्ध केला आहे,” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांची ही भूमिका केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांनी पाकिस्तानला सुनावलेले शब्द हे भारतातील मुस्लिमांचे देशनिष्ठ भाव दर्शवणारे असून, यामुळे देशांतर्गत समतेचा आणि एकतेचा संदेश अधिक बळकट झाला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्यावर यापूर्वी धार्मिक धृवीकरण केल्याचा आरोप वारंवार झाला आहे.ओवेसी हे नेहमी मुस्लिम समाजाच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे बोलत आले आहेत. त्यांनी अनेकदा ‘हिंदू राष्ट्रवाद’, ‘गौ-रक्षक’, किंवा ‘लव्ह जिहाद’ यासारख्या मुद्द्यांवर टीका केली आहे. यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना ‘हिंदूविरोधी’ म्हणून चित्रित केले आणि जनतेमध्ये त्यांच्याविरोधात भावना तयार झाली.
ओवेसी यांची काही भाषणे अशी होती की ती देशविरोधी असल्याचा आरोप झाला. उदाहरणार्थ, त्यांनी ‘भारत माता की जय’ म्हणायला नकार दिला होता, ज्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर कडाडून टीका झाली.
नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि NRC NRC च्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत आक्रमक होती. त्यांनी सरकारवर मुस्लिमांविरोधात कारवाई करत असल्याचा आरोप केला. या भूमिकेमुळे ते ‘फक्त मुस्लिमांच्या राजकारणावर’ भर देत असल्याचे म्हणत अनेकांनी टीका केली.
Asaduddin Owaisi became a hero for his nationalist stance against the backdrop of the India-Pakistan conflict!
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?