विशेष प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासोबत ढाब्यावर मटण पार्टीमध्ये सहभागी झालेल्या पुणे पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना सांगली कारागृहात नेत असताना घडली होती. पोलिसांच्या संरक्षणाखाली असलेल्या गजा मारणेसोबत पोलिसच जेवणाचा आस्वाद घेत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेतली आणि चौकशीअंती दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली.
निलंबित पोलिसांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक सूरज राजगुरू, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी यांचा समावेश आहे.
गजा मारणे मोक्का अंतर्गत येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली कारागृहात स्थलांतरित करत असताना, रस्त्यात एका ढाब्यावर थांबून त्याच्यासोबत जेवण करण्यात आले. यासोबतच त्याला मोटारींच्या ताफ्यासह नेत असल्याची माहितीही समोर आली आहे. गुन्हेगाराला विशेष वागणूक देणे, ड्युटीच्या वेळी बेजबाबदारपणा दाखवणे आणि कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारासह ढाब्यावर भेटलेल्या अन्य तिघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Five policemen suspended for participating in mutton party of Gaja Marane
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?