विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठासारखे आहेत. कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो,” अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत, ही आमची अट नाही, पण अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.
नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना राऊतांनी अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य करताना,अजित पवार-शरद पवार यांच्या एकत्र येण्याला विरोध का, असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “राज ठाकरे व नारायण राणे यांनी पक्ष सोडला, पण त्यांनी कधीही शिवसेनेवर दावा केला नाही. दोघांनी आपापले पक्ष स्थापन करून स्वतंत्र राजकारण केले. त्याउलट, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी पक्षच पळवला.”
राऊत म्हणाले की, मी नेहमीच नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं कौतुक करतो. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. मतभेद झाले तरी त्यांनी स्वतःचं राजकारण केलं. एकनाथ शिंदेप्रमाणे कधीही ‘शिवसेना माझीच’ असा दावा त्यांनी केला नाही.
अजित पवारांवर टीका करताना राऊत म्हणाले, “अजित पवारांनी अमित शहा यांच्या मदतीने शरद पवारांचा पक्ष पळवला आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, तर अजित पवारांचा गट फुटलेला आहे. त्याचप्रमाणे मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांची असून, एकनाथ शिंदेंचा गट वेगळा आहे. अमित शहा काय ठरवतात यावर जनता आपली भूमिका ठरवत नाही.”
सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत राहावे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्र सांभाळावा हे त्यांचे पहिल्यापासूनच ठरलेले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच दिल्लीमध्ये काम करत आहे. मात्र दिल्ली सांभाळण्याची जबाबदारी अजित पवार यांनी आता दाऊद इब्राहिम म्हणजेच भ्रष्ट प्रफुल्ल पटेल यांना दिली आहे. त्यांना राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी आहे. ते आता काम पाहत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा प्रश्नच येत नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांनी सांगितले की, राज्यात शक्य तेवढ्या जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहोत. काही ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो, पण बहुतांश महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्रच लढणार. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यात सतत संवाद सुरू असून, आघाडी अधिक मजबूत होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सरकारने लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. आमची पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र सरकारच्या वतीने अद्याप ईव्हीएमची तयारी झालेली दिसत नाही. त्यांची ईव्हीएमची तयारी पूर्ण झाल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करतील, असे वाटत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला.
Raj Thackeray is an open university; we expect him not to have immoral relationships, says Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?