विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. पाकिस्तानचे कंबरडे माेडले. मात्र, हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. यामुळे पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास शिवसेना शिंदे गटाने दहा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.Eknath Shinde
२२ एप्रिल राेजी पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भारतीय नागिरकांवर हल्ला करून २६ जणांची हत्या केली. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. या हल्ल्यातील हल्लेखाेरांची माहिती मिळावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दहशतवादाविरुद्ध एक निर्णायक पाऊल उचलले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यातील तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. एकनाथ शिंदे म्हणाले की, \”आम्ही दहशतवाद आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ठामपणे उभे आहोत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबाबत माहिती घेऊन पुढे येण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या आणि त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे
“पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेतील दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. संशयितांना पकडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन शिवसेनेने केले.
Eknath Shinde announces reward of Rs 10 lakh for finding terrorists involved in Pahalgam attack
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?