विशेष प्रतिनिधी
पुणे : मी शब्दांचा पक्का आहे. एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर निवडणुकीत पाडतोच आणि एखाद्याला खासदार करायचं म्हटलं तर तेही करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या राजकारणाचे सूत्र सांगितले.
पुणे जिल्ह्यातील अकोले येथे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जय भवानी पॅनलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. २०१९ साली पुरंदर विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांना उद्देशून दिलेला “कसा निवडून येतोस बघतोच” असा दम त्या काळात चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा तोच आत्मविश्वास त्यांनी या सभेत व्यक्त केला. ते म्हणाले, मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो. मी निवडणुकीत पाडतो; पण एखाद्याला खासदार करायचा म्हटल्यावर करतो; पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे. पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करीन.
पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, “खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं जातं आणि उर्वरित पाणी शेतीसाठी वापरलं जातं.यासाठी मुळशी धरणातून खडकवासला कालव्याला पाणी सोडण्याचा विचार सुरु आहे, खडकवासला कालव्यातून ११०० क्युसेकने सोडलेले पाणी इंदापूर टोकापर्यंत केवळ २३० क्युसेकने पोहोचते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होते. ही गळती रोखण्यासाठी आणि पाणी बचतीसाठी कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी मी आणि आमचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.”
Ajit Pawar said I am true to my words
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?