विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी म्हटले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही एक शिष्टाचार भेट होती, यावेळी विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजपा धर्म बुडवायला निघाला आहे. भाजपा लोकशाही व संविधान विरोधी आहे.
लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात सोबत राहणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात यावेळी चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसुचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी लोणार सरोवराची फोटोग्राफी असलेले एक पुस्तक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे फटकारे व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक त्यांनी भेट दिले तर मी उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावरील पुस्तक भेट दिल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Congress joins Shiv Sena in fight to save Maharashtra religion, Harshvardhan Sapkal meets Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- सी-व्होटर सर्व्हेचा निष्कर्ष : देशवासीयांचा भारतीय लष्करावर दृढ विश्वास, शस्त्रसंधीलाही दिला मोठा पाठिंबा
- Prime Minister Narendra Modi : आदमपूर एअरबेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आणि पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल
- Sharad Pawar : शरद पवार गटाची बैठक अन् अंकुश काकडे यांचा एकत्रिकरणाबाबत विराेधाचा सूर
- Tiranga Yatra : ऑपरेशन सिंदूरचे यश साजरे करण्यासाठी भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा