विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस (IPS officers) अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने शुक्रवारी बदल्या केल्या. आरती सिंह यांची गुप्तवार्ता विभागात पोलीस सहआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलवकडे यांची मुंबईमध्ये गुन्हे शाखेत अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांची बदली पुणे अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे.
पुण्यातील दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची नागपूरला बदली झाली आहे. नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांची पुणे शहर पोलीस दलात बदली झाली आहे. पुण्याचे प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया यांची अमरावती पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांची नागपूर येथे बदली झाली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांची पिंपरी चिंचवडला बदली करण्यात आली आहे.
सीआयडीचे उपमहानिरीक्षक जी. श्रीधर यांची पोलीस दळवळण, माहिती व तंत्रज्ञान, परिवहन विभागात बदली झाली आहे. मुंबईच्या वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त एम. रामकुमार यांची महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीमध्ये बदली झाली आहे. लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार मगर यांची राज्य राखीव पोलीस बलाच्या उपमहानिरीक्षकपदी बदली झाली आहे. बिनतारी पोलीस यंत्रणेचे अधीक्षक राजेश बनसोडे यांची पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे.
राज्यातील 26 आयपीएस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या
1. अनिल पारसकर – अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई.
2. शैलेश बलकवडे – अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई
3. एम. रामकुमार – संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे (पद अवनत करून)
4. शशीकुमार मीना – अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
5. प्रवीण पाटील – अपर पोलीस आयुक्त, नागपूर
6. संजय बी. पाटील – अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
7. वसंत परदेशी- अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर
8. एस.डी. आव्हाड – अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
9. एस. टी. राठोड – पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
10. पी.पी. शेवाळे – पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, बृहन्मुंबई
11. ए.एच. चावरिया – पोलीस आयुक्त, अमरावती शहर (पद अवनत करून)
12. विनिता साहु – अपर पोलीस आयुक्त, सशस्र पोलीस दल, बृहन्मुंबई
13. पंकज देशमुख – पुणे अपर पोलीस आयुक्त
14. प्रसाद अक्कनवरु – पोलीस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, बृहन्मुंबई
15. अमोघ गावकर – पोलीस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे
16. जी. श्रीधर – पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
17. मोक्षदा पाटील – पोलीस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल
18. राकेश कलासागर – पोलीस आयुक्त, लोहमार्ग, बृहन्मुंबई
19. प्रियंका नारनवरे – अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई
20. अरविंद साळवे – सहसंचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक
21. सुरेश कुमार मेंगडे – मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई
22. धनंजय कुलकर्णी – अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई
23. विजय मगर – रा र पोलीस उप महानिरीक्षक
24. राजेश बनसोडे – अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर
25. विक्रम देशमाने – अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई
26. राजेंद्र दाभाडे – अपर पोलीस आयुक्त, नागपूर शहर
Transfers of senior IPS officers in the state
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?