विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : भारत – पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. त्याचा पुनर्विचार करण्याची पाकिस्तानची विनवणी भारताने धुडकावून लावली. आता जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तुलबुल योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यावर पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी अब्दुल्ला यांना युद्धाची खुमखुमी असल्याची टीका केली होती. यावर अब्दुल्ला यांनी मुफ्ती यांना युद्धाचा मुद्दा नाही तर हक्काचा आहे, असे सुनावले आहे. Omar Abdullah and Mehbooba Mufti
लोकप्रियता मिळवण्यासाठी तसेच पाकिस्तानात बसलेल्या लोकांना खुश करण्यासाठी मुफ्ती सत्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला. सिंधू जल कराराच्या माध्यमातून जम्मू – काश्मीरमधील लोकांसोबत विश्वासघात करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या कराराला माझा कायमच विरोध होता आणि यापुढेही मी तो करत राहीन.
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तुलबुल नॅव्हिगेशन योजना पूर्ण करण्याची मागणी केली होती. यावर मुफ्ती यांनी पोस्ट करत तणावाच्या काळात अशी मागणी करण्यासाठी अब्दुल्ला यांच्यावर टीका केली. भारत – पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असताना अशाप्रकारे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी तुलबुल प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी करणे, दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा पद्धतीची विधाने करणे हे बेजबाबदारपणाचेच नाही तर भडकावणारे देखील आहे. देशातील अन्य कोणत्याही नागरिकांप्रमाणेच आमच्या भागातील लोक देखील शांततेचे हकदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचा हत्यार म्हणून वापर करणे हे अत्यंत अमानुष असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
महबूबा मुफ्ती यांच्या पोस्टवर उत्तर देत ते म्हणाले की, काही लोक सवंग लोकप्रियतेसाठी तसेच सीमेपलीकडे बसलेल्या लोकांना खुश करण्यासाठी सत्याकडे पाठ फिरवतात. सिंधू जल करारात सर्वाधिक तोटा जम्मू – काश्मीरमधील लोकांचा झाला आहे, हे तुम्ही का मान्य करत नाही, असा सवालही त्यांनी मुफ्ती यांना केला. त्यामुळे मी नेहमीच याचा विरोध करतो, आणि यापुढेही करत राहीन. जम्मू – काश्मीरमधील लोकांवर भूतकाळात जो अन्याय झाला आहे, त्यावर तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण, या कराराच्या माध्यमातून काश्मीरमधील लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्यात आले आहे.
तुलबुल नेव्हिगेशन बॅरेजचे 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला काम सुरू झाले होते. मात्र, परंतु सिंधू जल कराराचा हवाला देणाऱ्या पाकिस्तानच्या दबावामुळे ते सोडून द्यावे लागले. आता हा करार तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे, त्यामुळे आपण हा प्रकल्प पुन्हा सुरू करू शकू का, असा प्रश्न आहे. यामुळे आम्हाला झेलमचा वापर जलवाहतुकीसाठी करण्याची परवानगी मिळेल. तसेच डाउनस्ट्रीम पॉवर प्रकल्पांचे वीज उत्पादन देखील सुधारेल. हिवाळ्यात तुम्हाला याचा विशेष फायदा होईल, असे अब्दुल्ला म्हणाले.
तुलबुल प्रकल्प हा झेलम नदीवरील वुलर तलावाच्या मुखाशी 440 फूट लांबीचा नेव्हिगेशनल लॉक-कम-कंट्रोल स्ट्रक्चर होता. झेलमचे पाणी रोखण्यासाठी येथे 3 लाख अब्ज घनमीटर साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. तुलबुल प्रकल्पाची किंमत यावेळी 20 कोटी रुपये होती, परंतु झेलममध्ये वारंवार येणाऱ्या पुरामुळे बांधकाम चिखलात गाडले गेले. यामुळे झेलमचे पाणी काश्मीरमध्ये थांबू शकले नाही आणि ते पाकिस्तानकडे वाहत राहिले.
Omar Abdullah and Mehbooba Mufti clash over relaunch of Tulbul scheme
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?