विशेष प्रतिनिधी
मुंबई : कारागृहात असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिव्या दिल्या हाेत्या. इतरांसमाेर बाेलताना ते उध्दव ठाकरे यांची लायकी काढायचे. त्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. Sanjay Raut
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन हाेणार आहे. माझ्या पुस्तकात अनेक दावे केले गेले असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येईल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, पुस्तकात काही पाने लिहायची राहिली असतील. कारण संजय राऊत वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत, जी नावे दिली आहेत, त्याचा उल्लेख पुस्तकात करायचं विसरले आहेत, अशी टीका भाजप नेते व मंत्री नीतेश राणे यांनी केली आहे.
जेलमध्ये असताना ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या आहेत, उद्धव ठाकरेंची जी काही लायकी काढायचे ते इतरांसमोर बोलताना, त्याची जी काही माहिती आलेली आहे आमच्याकडे. त्या बाबतीतही उल्लेख करा. प्रेम बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर बेगडी प्रेम दाखवत आहात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांची लायकी, त्यांच्या कुटुंबाला शिव्या, यांना पोहोचून दाखवतो असे सांगण्याची मजल या संजय राऊत यांची गेली होती. मग का त्या पुस्तकात उल्लेख केलेला नाही? अर्ध, अपुरे पुस्तक लिहू नये. पूर्ण पुस्तक काढा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचे काम उद्धव ठाकरेच करतील, असे नीतेश राणे म्हणाले आहेत.
Sanjay Raut used to abuse Uddhav Thackeray while in jail, claims Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?