विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतातील इसीस (ISIS) संलग्न दहशतवादी कारवायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठे यश मिळाले आहे. पुण्यातील इसीस स्लीपर सेल प्रकरणातील दोन मुख्य फरार आरोपी अब्दुल फैयाज शेख आणि तल्हा लियाकत खान – यांचे ओमानमधून यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले असून, शनिवारी सकाळी दोघांना मुंबईत आणण्यात आले.
हे दोघेही २०२२ पासून फरार होते. त्यांच्याविरोधात एमसीएने पूर्वीच प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय आणि ओमानी अधिकाऱ्यांमधील कायदेशीर आणि राजनैतिक समन्वयानंतर हे प्रत्यार्पण शक्य झाले.
शेख आणि खान हे पुण्यातील कोंढवा परिसरातील ISIS स्लीपर मॉड्यूलचे प्रमुख होते. २०२२ मध्ये या मॉड्यूलचा भांडाफोड झाल्यानंतर त्यांनी योजनाबद्ध पद्धतीने देश सोडला. खानची पत्नी व मुलगी २ मे २०२२ रोजी ओमानला गेल्या होत्या. खान स्वतः १२ ऑगस्टला ओमानमध्ये दाखल झाला. शेखच्या कुटुंबीयांनी जूनमध्ये पलायन केले आणि तो स्वतः १५ जुलैला भारताबाहेर गेला. या हालचालींवर गुप्तचर यंत्रणांनी लक्ष ठेवले होते.
NIA च्या तपासानुसार, पुण्यातील कोंढवा भागात अब्दुल फैयाज शेखच्या डायपर दुकानामध्ये एप्रिल २०२२ मध्ये गुप्त आईडी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी स्फोटक रसायने आणणे, प्रशिक्षण घेणे आणि कटकारस्थान आखणे अशा क्रिया सुरू होत्या. झुल्फिकार अली बडोदवाला, मोहम्मद इमरान खान, युनूस साकी, सिमाब काझी आणि अब्दुल कादिर पठाण हे सहभागी आरोपी होते.
ही कार्यशाळा रतलामस्थित ISIS युनिट “अल सुफा”च्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. अटक आरोपी इमरान खान या कटाचा समन्वयक होता. याशिवाय, शमीळ नाचन ज्याचे वडील साकीब नाचन हे दोषी ठरलेले दहशतवादी आहेत याने ‘अमीर-ए-हिंद’ म्हणून भूमिका बजावल्याचे तपासातून समोर आले आहे. त्याच्यासोबत आकिफ नाचननेही स्फोटक रसायने पुण्यात पोहचवण्यात मदत केली होती. दोघेही शेखच्या घरी मुक्कामी होते.
NIA अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोघांच्या चौकशीतून महाराष्ट्रासह भारतात कार्यरत ISIS नेटवर्कची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीतून ISIS चा भरती तंत्र, प्रचारयंत्रणा आणि दहशतवादी कटांचे तपशील उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“या दोघांचे भारतात परतणे ही ISIS च्या पायाभूत रचनेला खिंडार घालणारी मोठी कारवाई आहे,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांचाही सहभाग केवळ विचारधारेच्या प्रसारापुरता मर्यादित नसून, प्रत्यक्ष दहशतवादी कारवायांच्या अंमलबजावणीपर्यंत होता.
संपूर्ण प्रकरण NIA कडून भारतातील ISIS संलग्न गटांवरील व्यापक तपासाचा भाग असून, आतापर्यंत अनेक अटक्या झाल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे, स्फोटके आणि जहाल साहित्य जप्त करण्यात आले आहे.
फैयाज शेख आणि तल्हा खान यांना आता विशेष NIA न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे.
NIA takes major action in Pune ISIS module case, extraditing two main accused from Oman
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?