Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर

Indrayani Riverbed : चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या ३६ बंगल्यांवर बुलडोझर

Indrayani Riverbed

विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रातील  (Indrayani Riverbed) निळ्या पूर रेषेत उभारण्यात आलेल्या ३६ अनधिकृत बंगल्यांवर पालिकेने बुलडोझर चालवला. शनिवारी सकाळपासून पिंपरी- चिंचवड महापालिकेने कारवाई सुरु केले. हे सर्व बंगले जमिनदोस्त झाल्याने इंद्रायणी नदीपात्र मोकळे झाले.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेने चिखली येथील इंद्रायणी नदी पात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास ३६ बंगल्यांवर बुलडोझर चालविला . चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून निळ्या पूर रेषेत अनधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती.

रिव्हर व्हीला प्रोजेक्ट मध्ये एकूण 36 बंगले आहेत. पैकी 29 रहिवाशी न्यायालयात गेले होते. या ओपन प्लॉटिंगवर जवळपास ३६ जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते. हे बंगले नदीपात्रातील निळ्या पूर रेषेत अनधिकृत पणे उभारण्यात आल्याने या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

या खटलाच्या अंतिम निकालात सर्वोच्च न्यायालयाने ३१ मे २०२५ पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदीपात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई सुरू केली. या कारवाईमुळे बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

Bulldozers on 36 bungalows built in the Indrayani riverbed in Chikhali

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023