विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आयकर विभागाच्या नावाखाली १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य संशयित राहुल भुसारे याला अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने स्वतःला आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवले आणि भुजबळ यांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचा बनाव करत छापा टाकण्यात येणार असल्याचा खोटा इशारा दिला. त्यानंतर त्याने “मी त्या छाप्याच्या टीममध्येच आहे, मदत हवी असेल तर १ कोटी रुपये द्यावे लागतील” असे म्हणत खंडणीची मागणी केली.
छगन भुजबळ यांनी याबाबत सांगितले की, त्यांचा स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे संबंधित व्यक्तीने फोन करून ‘साहेबांशी बोलायचं आहे’ असे सांगितले. विचारणा केली असता त्याने सांगितले की भुजबळ यांचे फार्महाऊसवर कॅश असल्याचे आयकर विभागाच्या माहितीत आले असून, लवकरच छापा पडणार आहे. त्यातून सुटका हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. वारंवार फोन येत असल्याने भुजबळ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे थेट तक्रार केली.
या तक्रारीवरून संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवर खंडणी, फसवणूक आणि आयपीसीच्या अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-गुजरात महामार्गावरील करंजाळी परिसरात सापळा रचून राहुल भुसारे याला अटक केली.
सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. हा प्रकार म्हणजे राजकीय नेत्यांना टार्गेट करून खोट्या धमक्यांच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Chhagan Bhujbal threatened with income tax raid and demanded a ransom of Rs 1 crore
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?