विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray आज जे बघतोय त्याला लोकशाही मानायची की हुकुमशाही याचे उत्तर सोपे आहे. हुकुमशहा कोणी असला तरी एक दिवस त्याला जावे लागते. हिटलरला जग घाबरायचे. पण त्याला आत्महत्या करावी लागली, हा हुकुमशहाचा शेवट असतो, अशा शब्दात शिवसेना उद्धव गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर नाव न घेता टीका केली. Uddhav Thackeray
संजय राऊत लिखित स्वर्गातील नर्क या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत संजय राऊत यांच्या मुलाखती येत आहेत आणि पुस्तकातील काही प्रसंग चर्चिले जात आहेत. त्यामध्ये अमित शाह यांच्या प्रसंगाचाही उल्लेख आहे. पण मला जर कोणी विचारलं की, अमित शाह तुमच्या घरी आले होते का? बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का? तर मी सांगेन मला आठवत नाही.
कारण आपल्या वाडवडिलांनी कोणावर उपकार केले असतील, तर ते मोजायचे नसतात. उपकारांची फेड कृतज्ञतेने करायची की कृतघ्नपणे करायची हे ज्याच्या त्याच्यावर असते. आम्ही तुमचे बुरसटलेले हिंदुत्व मान्य करायला तयार नाही म्हणूनच अमित शहा आम्हाला दुश्मन समजतात, अशी टीका ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला संपविण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. 1969 साली शिवसेनाप्रमुखांनाही सीमा प्रश्नावरून 100 दिवसांचा तुरुंगवास झाला होता. तेव्हा मोरारजी देसाई उपपंतप्रधान होते. आणीबाणीच्यावेळी रजनी पटेल होते. शिवसेनेवर वरवंटा का फिरतोय, कारण आम्ही मराठी माणसाचे हित जपतोय. 1975 साली रजनी पटेल यांनी सांगितले होते की, शिवसेना काँग्रेसमध्ये विलिन करा. तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, तसे केलेत तर तुमची अंत्ययात्रा निघेल. त्यामुळे हे सरकार पण जाणार आहे आणि ते घालवायलाच लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडली.
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?